Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सिटी आयकॉन पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई आवाज वृत्तवाहिनीच्या वतीने नवी मुंबई आवाज पनवेल-उरण अ‍ॅचिव्हर्स अ‍ॅवॉर्ड 2019चे आयोजन शुक्रवारी

(दि. 23) करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सिटी आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या वतीने महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे आदी उपस्थित होते.या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिका प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, भाजप ओबीसी सेलचे आर. के. दिवाकर, रमेश तुपे यांच्यासह इतर मान्यवरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply