Breaking News

पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट

19 जण ठार, अनेक जखमी

गुरुदासपूर (पंजाब) ः वृत्तसंस्था

पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील बाटला येथील एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. यात अनेक जण जखमी झाले असून, दोन इमारतीत 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये भीती पसरली आहे. बुधवारी (दि. 4) दुपारी 4च्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती आहे.

या स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे. त्यांच्यावर त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत, तसेच दोन इमारतीत 50 जण अडकल्याची माहिती आहे. या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथक प्रयत्न करीत आहे. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथक प्रयत्न करीत आहे. स्फोटानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूर पसरला. या धुरामुळे लोकांना बाहेर काढताना अडचण येत आहेत, असे बचाव पथकातील एका अधिकार्‍याने सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply