Breaking News

शिर्की गावात जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

पेण : प्रतिनिधी

जेएसडब्ल्यू कंपनी आणि शिर्की ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्की गावांतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी (दि. 17) माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेचे सदस्य प्रभाकर म्हात्रे, माजी सदस्य वैकुंठ पाटील, जेएसडब्ल्यूचे विनायक दळवी, बळवंत जोग, वडखळ सरपंच राजेश मोकल, मसद सरपंच बळीराम भोईर, जिते सरपंच वासुदेव म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जलवाहिनीसाठी पंचक्रोशी ग्रामविकास चळवळ व शिर्की ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू होते. या जलवाहिनीमुळे शिर्की ग्रामपंचायत हद्दीमधील गावांतील पाण्याची समस्या दूर होणार आहे.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply