Breaking News

कुस्तीत सुरेखा वाघमारे सरस

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या कर्जत तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत तिघर शाळेतील सुरेखा शंकर वाघमारे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तिची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.

रायगड जि. प. शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. यात विविध खेळांचा समावेश असतो. यंदा कर्जत तालुकास्तरीय स्पर्धा अभिनव ज्ञानमंदिर येथे झाली. यातील कुस्ती प्रकारात तिघर शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी सुरेखा शंकर वाघमारे हिने 40 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला. सुरेखा ही वाडीवस्तीवरची मुलगी असून, फक्त शाळेतील मार्गदर्शनावर तिने या यशाला गवसणी घातली. यामुळे तिची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठीही निवड झाली आहे. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुरेखा वाघमारे हिला क्रीडाशिक्षक जनार्दन पजई, तिघर शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर इंगळे, विषय शिक्षिका सविता खडे, योगिता वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.

Check Also

कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत सीकेटीच्या स्वस्तिका घोषची सुवर्णझेप

पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स …

Leave a Reply