Breaking News

खारघर येथील सीकेटी विद्यालयात हिंदी दिवस साजरा

खारघर ः रामप्रहर वृत्त

ज.भ.शि.प्र. संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी विश्व हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्र्रमास प्राचार्य के. के. म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले. वाणिज्य विभागप्रमुख आणि हिंदी विषयाचे शिक्षक प्रमोद शेळके, विज्ञान विभाग प्रमुख दुर्गादेवी मौर्या, परीक्षा विभागप्रमुख अस्मिता म्हात्रे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वप्ना भांडवलकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 12वी वाणिज्यमधील शमिला हमदुल्ले हिने केले. विश्व हिंदी दिवसाचे औचित्य साधून शेरोशायरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जागृती मोरे 11 वी विज्ञान प्रथम क्रमांक, शर्मिला हमदुल्ले 12 वी वाणिज्य द्वितीय क्रमांक, प्रणव मानकर 11 वी वाणिज्य तृतीय क्रमांक यांनी यश मिळविले. परीक्षक म्हणून प्रमोद शेळके, अस्मिता म्हात्रे यांनी काम पाहिले. संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, कार्यकारी मंडळ सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, सचिव डॉ. गडदे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply