Breaking News

दासगावजवळ बस घसरली; 14 प्रवास जखमी

महाड : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव गावाजवळ मंगळवारी

(दि. 24) सायंकाळी 5:30च्या सुमारास एक खाजगी बस रस्त्या कडेला घसरली. या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले आहेत.

अचानक आलेल्या पावसामुळे बस क्रमांक एमएच 48-के 6787 दासगाव येथे रस्त्यावरून घसरून आदळली. जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी बसच्या बाहेर काढून दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि महाड ट्रामा सेंटरमध्ये दाखल केले. हे प्रवासी पोलादपूर तालुक्यातील देवळे गावात उत्तरकार्यासाठी मुंबईहून आले होते. उत्तरकार्य आटोपून मुंबईकडे जात असताना अपघात घडला. किरकोळ जखमी झालेल्यांमध्ये बसचालकाचाही समावेश आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply