Breaking News

नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरू; नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांच्या मागणीला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी नवीन पनवेल येथील सेक्टर 13 व 14 मधील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन पनवेल महापालिका आयुक्तांना दिले होते. या निवेदनाची दखल घेत नवीन पनवेल येथील सेक्टर 13 व 14 मधील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणीला सुरुवात करण्यात

आली आहे.

नवीन पनवेल सेक्टर 13 व 14 परिसरातील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती त्यामुळे तेथील नागरिकांची वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक होते तपासणी केल्यानंतर त्यावर विविध उपाययोजना करणे सोपे जाऊ शकते. नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांच्या मागणीनुसार महापालिकेमार्फत नवीन पनवेल येथील सेक्टर 13 व 14 मधील नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नगरसेविका वाघमारे यांचे आभार मानले.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply