पनवेल : रामप्रहर वृत्त
नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू आहे. पनवेलमध्ये मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्रोत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. या नवरात्रोत्सवाला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांच्या हस्ते उत्तम नृत्य करणार्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळातर्फे दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा या झंकार नवरात्रोत्सवाचे 13वे वर्षे आहे. त्यानिमित्त रविवारी
(दि. 29) घटस्थापनेच्या दिवशी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी देवीची सपत्नीक पूजा करीत दर्शन घेतले, तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शकुंतला रामशेठ ठाकूर यांनीही देवीचे दर्शन घेतले.
RamPrahar – The Panvel Daily Paper