Breaking News

टेम्पोची स्वीफ्ट गाडीला धडक; दोन जखमी

पनवेल : वार्ताहर

पनवेलजवळील पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्गावरील किमी नं. 8/800 मार्गावरून जाणार्‍या भरधाव कोंबड्याच्या टेम्पोने त्याच्या पुढे जाणार्‍या स्वीफ्ट गाडीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्वीफ्ट गाडीतील दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्गावरील किमी नं. 8/800 वरून कोंबड्यांचा टेम्पो चालला असताना त्याने पुढे चाललेल्या स्वीफ्ट गाडीस पाठीमागून धडक दिल्याने त्या गाडीतील मोहम्मद तमीद मोहम्मद अली हुसेन हा टी-परमिट गाडीचा चालक, तसेच प्रवासी पोलमी आपटे (20) हे दोघे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

सुमन कल्याणपूर; एक आवाज, अनेक गोष्टी…

सुमन कल्याणपूर म्हणताच हिंदी चित्रपट संगीत शौकीनांना पटकन ही गाणी आठवणारच. ना ना करते प्यार …

Leave a Reply