Breaking News

मयांक ‘टॉप 10’मध्ये

दुबई : वृत्तसंस्था

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत 2-0 असे निर्भेळ यश मिळवले. याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत भारतीय फलंदाजांना फायदा झालेला आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल फलंदाजांच्या क्रमवारीत दहाव्या स्थानी दाखल झाला आहे.

मयांकच्या खात्यात सध्या 700 गुण आहेत. याआधी तो 11व्या स्थानावर होता. दुसर्‍या कसोटी सामन्यानंतर त्याचे स्थान वधारले. याव्यतिरिक्त भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दुसर्‍या, तर चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर कायम राहिले आहेत.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply