Breaking News

खोपोलीत लाठीकाठीने हल्ला

आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

खालापूर : प्रतिनिधी

खोपोलीनजीकच्या साजगाव येथे सुभाष प्रीमियर या कंपनीच्या नव्याने सुरू असणार्‍या कामाचा ठेका मिळविण्यावरून झालेल्या हाणामारीत सहाजण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चार आरोपींना खोपोली पोलिसांनी अटक केली असून, फरार झालेल्या पाच आरोपींचा शोध सुरु आहे. सुभाष प्रीमियर या कंपनीला मटेरियल सप्लाय करण्याचा ठेका तेजस देशमुख याला मिळाला होता. या कामाचा ठेका आम्हालाही मिळावा अशी मागणी सागर लक्ष्मण कडवे व त्याच्या आठ साथीदारांनी कंपनीकडे केली होती. मात्र काम न मिळाल्याने सागर कडवे, अक्षय कडवे, निलेश म्हात्रे, अजय गायकवाड यांनी कंपनीच्या साजगांव येथील साइटवर जावून, तेजस देशमुख, प्रफुल देशमुख व त्यांच्या 5 साथीदारांना लोखंडी सळई व रॉड यांचा धाक दाखवून, लाठीकाठीने मारहाण केली. यात जखमी झालेल्या तेजस देशमुख व इतर पाच जणांना खोपोलीतील जाखोटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी तेजस देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी  सागर कडवे (वय 25), अक्षय कडवे (वय 23), निलेश म्हात्रे (वय 23) आणि अजय गायकवाड (वय 20; सर्व रा. साजगाव खोपोली) यांना अटक केली आहे. खालापूर न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर या  घटनेतील पाच आरोपी फरार असून त्यांचा खोपोली पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास उपनिरीक्षक वळसंग करीत आहेत.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply