Breaking News

गुरुकुलमध्ये सामाजिक विज्ञान शास्त्र सप्ताह

मोहोपाडा : प्रतिनिधी

चौक येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल स्कुलमध्ये सामाजिक विज्ञान शास्त्र सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सुरुवात योगेश्वरस्वामीज, आत्मस्वरूप स्वामीजी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आली.

या वेळी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागूणांना वाव मिळण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात पहिल्यादिवशी मुलांनी देशभक्तीपर गीते सादर केली, तसेच इतिहासातील जालियनवाला बाग हत्याकांड या विषयावर मुलांना चित्रफित दाखविण्यात आली.

तसेच मॅप पॉयटिंग, लबेलिंग, स्वच्छता अभियान या विषयावर मुलांनी नाटीका सादर केली. मुलांना शिक्षणाबरोबर पर्यावरणाचे ज्ञान मिळण्यासाठी शाळेने इयत्ता चौथी ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन कर्नाळा बर्ड अभयारण्य येथे करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य जॉन्सन यांचे मोलाचे मार्गदर्शन व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर गोळे, योगेश पवार, रश्मी या समाजशास्त्र विषय शिक्षकांनी केले.

Check Also

टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन अन्‌‍ शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या …

Leave a Reply