Breaking News

माजी विद्यार्थ्यांचा उद्या मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा ़फुले एएससी कॉलेजमध्ये रविवारी (दि. 19) सकाळी दहा वाजता माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा मेळावा माजी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने व महाविद्यालयास भविष्यामध्ये एका मोठ्या उंचीवर नेण्यासाठी त्यांचे सहकार्य घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यास सर्व क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने सर्व माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर व त्यांचे सहकारी प्राध्यापक यांनी केले आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply