
अलिबाग : जिमाका
भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशाप्रमाणे शनिवारी (दि. 25) राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवसासाठी एश्रशलीेींरश्र ङळींशीरलू षेी डीीेंपसशी ऊशोलीरलू हा विषय आयोगाने निश्चित केलेला आहे. हा कार्यक्रम जिल्हा, मतदारसंघ, तालुका व मतदान केंद्र स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. मतदार दिवसानिमित्त राष्ट्रीय मतदार दिवसाची मराठी भाषेतील शपथ घेणे, नवीन नोंदणी झालेल्या मतदारांना बॅच वितरित करणे, मतदार नोंदणी जागृतीबाबत चित्रफीत दाखविणे, युवक मतदार महोत्सव साजरा करणे आणि निवडणूक साक्षरता क्लबच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने जिल्हा तसेच मतदारसंघ स्तरावर शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनाचा जिल्हा स्तरावरील कार्यक्रम शनिवारी सकाळी 10 वाजता अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. त्यात निवडणूक व मतदान विषयावर आधारित निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रांगोली स्पर्धांत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना तसेच मतदार यादीसंदर्भात उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (इेेींह ङर्शींशश्र जषषळलशी) यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी सकाळी 8 वाजता अरुणकुमार वैद्य हायस्कूल ते पीएनपी नाट्यगृह यामार्गे विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईड तसेच भावी युवा मतदार यांची रॅली काढण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper