नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाला आता पुन्हा वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणातील एक दोषी मुकेशकुमार सिंह याने आपल्या पूर्वीच्या वकिलांवर आरोप करीत सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी असतो, ही माहिती दिली गेली नाही, असा दावा मुकेशने केला आहे. हे लक्षात घेत आता सर्व प्रकारची कार्यवाही रद्द करून पुनर्विचार याचिका आणि इतर कायदेशीर उपचारांचा वापर करण्याची आपल्याला परवानगी द्यावी, अशी मागणी मुकेशने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. आता मुकेशने आपले नवे वकील एम. एल. शर्मा यांच्याद्वारे ही नवी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता कोर्टाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Check Also
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य मूट कोर्टचे बुधवारी उद्घाटन
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक …
RamPrahar – The Panvel Daily Paper