Breaking News

जागतिक महिला दिनानिमित्त ‘वुमन्स मॅरेथॉन 2020’ उत्साहात

पनवेल ः प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खांदा कॉॅलनी परिसरात रविवारी (दि. 8) महिलांसाठी संजय भोपी सोशल क्लब, मॉर्निंग योगा ग्रुप आणि अलर्ट सिटिझन फोरम खांदा कॉॅलनी यांच्या वतीने ‘वुमन्स मॅरेथॉन 2020’चे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेचा शुभारंभ पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आला.

स्पर्धेत परिसरातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता. या वेळी पनवेल  महापालिकेचे प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष संजय भोपी, प्रेमा भोपी, अभिषेक भोपी यांच्यासह पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply