Breaking News

येस बँकही आता ‘कर्नाळा’च्या मार्गावर

पेण ः येस बँकेची आर्थिक स्थिती घसरल्याने आणि अनियमित कर्जवाटप केल्याप्रकरणी शुक्रवारी (दि. 6) येस बँकेवर निर्बंध घालून ईडीने चौकशी करण्यास सुरुवात केली. ही वार्ता ग्राहकांना समजताच खातेदार, ठेवीदारांनी येस बँक व एटीएमबाहेर तुफान गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे येस बँकही आता कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या मार्गावर चालली आहे. सकाळपासूनच पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील येस बँकेच्या शाखेत ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. केंद्राने खातेदारांना 50 हजार देण्यात येतील, असे जाहीर केल्याने हे पैसे पदरी पाडण्यासाठी ग्राहक बँकेबाहेर उभे होते. देशातील अनेक बँका आर्थिक अडचणीत आल्याने त्यांच्यावर निर्बंध घालून यातील काही बँका बंदही पडल्या आहेत. त्यामुळे खासगी बँकांत काबाडकष्ट करून ठेवलेला पैसा वेळेवर मिळत नसल्याने अशा बँकांविषयी ग्राहकांत नाराजी पसरली आहे.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply