Breaking News

पुरणपोळ्यांचे वाटप : कामोठे भाजप युवा मोर्चा मंडळाचा उपक्रम

कामोठे : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडळाने एक पोळी होळीची, भुकेलेल्या मुखाची नावाचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला होता. कामोठे शहरातील अनेक सामाजिक संस्था तसेच सोसायटी, मंडळ यांना आवाहन केले होते. त्या आवाहनाला कामोठेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. आणि 500 पुरणपोळ्या  पनवेल येथील अनाथ आश्रम तसेच वृध्दाश्रम येथे देण्यात आल्या.

हा उपक्रम असाच पुढे नेत या पुढे दरवर्षी या पेक्षा जास्त आणि चांगल्या पद्धतीने राबविणचा मानस आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडळ अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यानी केले.ं या उपक्रमासाठी सुशील शर्मा, सुजीत पूजारी, भास्कर दांडेकर, जयश्री ढापते, सोनाली खरतमोल, दीक्षा लवंगरे, मीना सदरे, नम्रता पवार, सुरेखा लांडे, पल्लवी पाटील यांनी या उपक्रमासाठी आपले योगदान दिले.या वेळी मंडल अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस सुशील शर्मा, नवनाथ भोसले, उपाध्यक्ष तेजस जाधव, धीरज सिंग, चिटणीस प्रवीण कोरडे, अमित झावरे, अमित सावंत, श्रीकांत पाटील हे उपस्थित होते.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply