पनवेल : रामप्रहर वृत्त
गुढीपाडव्याचा सण बुधवारी (दि. 24) पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा निरोगी आरोग्याची गुढी उभारण्याचा संकल्प नागरिकांनी केल्याचे दिसून आले.
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षारंभ होतो. भारतीय संस्कृतीत चैत्र महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. केवळ धार्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिकच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही हा मास उत्साहवर्धक असतो, परंतु या वर्षी संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे सावट आहे. त्यामुळे आपला देशही सध्या लॉकडाऊन आहे. या पार्श्वभूमीवर पाडव्यानिमित्त निघणार्या शोभायात्राही रद्द करण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी विधीवत पूजा-अर्चा करून व गुढी उभारून साधेपणाने गुढीपाडवा साजरा केला. सोशल मीडियावरही घरी राहून आरोग्याची काळजी घेत हा सण साजरा करण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
Check Also
नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हरकतींवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्या
प्रधान सचिव लोकेश चंद्रा यांचे आदेश; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास गती मुंबई : रामप्रहर वृत्तनवी …
RamPrahar – The Panvel Daily Paper