Breaking News

नेरळमध्ये भाजपकडून सॅनिटायझर फवारणी

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या पुढाकाराने नेरळ गाव कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. नेरळ गावात सर्व भागात फवारणी करण्यात येत असून याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.नेरळ ग्रामपंचायत हद्दीत सॅनिटायझर फवारणी करण्यात येत असून फवारणी करण्याच्या कार्याचा शुभारंभ भाजप कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर आणि नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांच्या उपस्थितीत जकात नाका येथे करण्यात आला. खोपोली हनिफ सॅनिटायझर यांच्या माध्यमातून नेरळ गावात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. या वेळी भाजप प्रज्ञा प्रकोष्ठचे कोकण संयोजक नितीन कांदळगावकर, नेरळ शहर अध्यक्ष अनिल जैन, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र लोभी, संतोष शिंगाडे, प्रकाश पेमारे, शंकलेश जैन, नरेंद्र कराळे, विमल व्यास, दत्ता ठमके आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply