Breaking News

उरणमध्ये संचारबंदी, चोख पोलीस बंदोबस्त

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

देशभरात 25 मार्चपासून 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे जारी करण्यात आलेल्या संचारबंदीला उरण शहरासह संपूर्ण उरण तालुक्यात नागरिकांनी कोरोना संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी घराबाहेर न येणे पसंद केले असल्याने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई परिमंडळ-2चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठलराव दामगुडे व उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी उरण शहरात परिस्थितीची  पाहणी केली. या वेळी दुपारच्या सत्रात उरण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या चारफाटा येथून राजपालनाकामार्गे वैष्णवी हॉटेल येथील मोरा रोडवरील पेन्शनर पार्कपर्यंत संपूर्ण उरण शहरात पाहणी करीत असताना वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त विशेष कोणतेही नागरिक घराबाहेर येत नसल्याचे चित्र पोलीस उपायुक्तांना दिसून आले. तर उरण पोलिसांनी उरण शहरात प्रत्येक नाक्यावर पोलीस बंदोबस्त चोख ठेवल्याने शुकशुकाट असल्याचे पाहिले.

Check Also

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त गव्हाण येथे ग्रामस्वच्छता मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

Leave a Reply