नवी दिल्ली, मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत असली तरी या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून, मंगळवा (दि. 7) दिवसभरात राज्यात दीडशे नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे आता कोरोनाबाधितांचा आकडा 1018वर गेला आहे. एकट्या मुंबईत 116 नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 4,421 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासांत 354 नव्या रुग्णांची भर पडली. आतापर्यंत एकूण 144 रुग्णांचा मृत्यू, तर 326 रुग्ण बरे झाले आहेत.
Check Also
लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…
काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …
RamPrahar – The Panvel Daily Paper