Breaking News

मॉर्निंग वॉक करणार्‍या 66 जणांची खोपोली पोलिसांकडून धरपकड

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
कोरोनामुळे संचारबंदी असूनही मॉर्निंग वॉक करणार्‍या 66 जणांना खोपोली पोलिसांनी शुक्रवारी (दि. 17) ताब्यात घेतले. यामध्ये 63 पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.
खोपोली शहरातील विविध रस्ते, मोकळे प्लॉट व मॉर्निंग वॉकसाठी प्रसिद्ध ठिकाणी पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोलीचे निरीक्षक धनाजी क्षीरसागर व उपनिरीक्षक श्रीरंग किसवे यांच्या नेतृत्वाखालील दोन पथकांनी ही कारवाई केली. या वेळी काही जण पळून जाण्यास यशस्वी ठरले असले तरी 66 नागरिकांची पोलिसांनी धरपकड केली. या सर्वांना तीन तास बसवून ठेवून नंतर समज देऊन सोडण्यात आले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply