पनवेल, उरण, कर्जत : पनवेल तालुक्यात तीन, तर जासई (ता. उरण) आणि नेरळ (ता. कर्जत) येथे प्रत्येकी दोन असे एकूण पाच नवे कोरोना रूग्ण सोमवारी (दि. 20) आढळून आले. यात दोन डॉक्टर्सचा समावेश आहे. या नव्या रूग्णांमुळे रायगड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 54 झाली आहे. खारघर येथील रुग्ण डॉक्टर असून त्यांचे मुंबईतील शिवडी येथे क्लिनिक आहे. खांदा कॉलनीतही अष्टविनायक हॉस्पिटलमधील एका डॉक्टर व रूग्णाला लागण झाली आहे. नेरळ येथील तरुण कर्जत तालुक्यातील पहिला कोरोना रुण ठरला आहे. तो नवी मुंबईतील दिघा एमआयडीसीत असलेल्या औषध निर्माण कंपनीत फार्मासिस्ट म्हणून काम करतो, तर जासईत आढळलेला रुग्ण अवघ्या दीड महिन्याचे बालक आहे.
Check Also
‘नेहले पे देहला’ @ ५० वर्षे; पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंजक
सुनील दत्तच्या वांद्य्रातील पाली हिलवरील अजंठा बंगल्यातील तळघरात असलेल्या मिनी थिएटरमध्ये एखादा चित्रपट अथवा गाणी …
RamPrahar – The Panvel Daily Paper