कोरोनाच्या संकटातून मच्छीमारांना सावरण्यासाठी अॅपची निर्मिती
पाली : प्रतिनिधी
आधुनिकतेच्या काळात शहरांप्रमाणेच कोळीवाडेही स्मार्ट करण्याच्या उद्देशाने अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे शास्त्रज्ञ प्रणित पाटील बोंबील ऑन डिमांड प्लॅटफॉर्म अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपद्वारे ताजी, स्वच्छ आणि स्वस्त मासळी एका क्लिवर घरपोच मिळणार आहे. यात मच्छीमारांसाठी नोंदणी मोफत असून कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी निर्माण केलेल्या या अॅपचे कोळी बांधव व मच्छीमार स्वागत करीत आहेत.
प्रणित पाटील यांच्या या सामाजिक प्रकल्पात तंत्रज्ञात हाताळण्याची जबाबदारी विनोद खारिक, सुशांत म्हात्रे, भूषण तांडेल यांनी घेतली आहे. समाजातील लोकांमध्ये या चळवळीची जनजागृती करण्यासाठी योगेश पाटील, स्वप्नील पाटील यांनी पुढाकार घेतला असून स्वत: मच्छीमार व वितरक असणारे गणेश नाखवा या प्रकल्पाला कोळीणीची साखळी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
या अॅपचे नाव बोंबील असले तरी या माध्यमातून समुद्र व खाडीतील सर्व प्रकारची मासळी रायगड, ठाणे, पालघर व मुंबईला टप्प्याटप्प्याने पुरविली जाणार आहे. थुु.लेालळश्रश्र.लेा या संकेतस्थळावर तसेच गुगल प्ले स्टोरवर हे अॅप उपलब्ध आहे.
-प्रणित पाटील, शास्त्रज्ञ
RamPrahar – The Panvel Daily Paper