Breaking News

भाजप नेते महेश कडू यांच्याकडून कंटेनर यार्ड येथे जीवनोपयोगी वस्तू

उरण : वार्ताहर

जगभरात कोरोना या आजाराने सर्वत्र थैमान घातले असून त्या पार्श्वभूमीवर 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. म्हणून उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदशनाखाली भाजप महालण विभागीय अध्यक्ष महेश कडू यांनी कंटेनर यार्डातील कंटेनर ड्रायव्हरांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप केले.

गुरुवारी व शुक्रवारी सोनारी गावात व कंटेनर यार्ड येथे लॉकडाऊन काळात गरीब गरजू 150 लोकांना व कंटेनर यार्डातील 25 कंटेनर ड्रायव्हर लोकांना दैनंदिन जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी सोबत सोनारी गावचे अध्यक्ष दिनेश रमण तांडेल व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. घरी राहा, सुरक्षित राहा, तुम्ही खबरदारी घ्या, असे ही आवाहन भाजप महालण विभागीय अध्यक्ष महेश कडू यांनी लोकांना केले.

Check Also

भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक

विविध विषयांवर विचारविनिमय पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक …

Leave a Reply