Breaking News

कबड्डी स्पर्धेत उरण संघ विजेता

श्रीगाव : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील देहेन येथे जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पुरुष गटाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत गणेश क्लब उरणने विजेतेपद पटकाविले. विनायक दिवलांग संघ उपविजेता ठरला.रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य विकास निलकर यांच्या हस्ते झाले. तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे गणेश दिवलांग व न्यू चॅलेंजर कोपर यांनी प्राप्त केला. विजयी चारही संघांना स्व. द्रौपदी जुईकर चषक व रोख रकमेचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून भरत पाटील (उरण), उत्कृष्ट चढाईपटू सागर पाटील (गणेश दिवलांग), उत्कृष्ट पकड करणारा चेतन पाटील (विनायक दिवलांग) आणि पब्लिक हिरो मनीष ठाकूर (कोपर) यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply