Breaking News

शहर निर्जंतुकीकरणासाठी अत्याधुनिक फॉगिंग मशिन

स्वाध्यायी परिवाराचा पुढाकार

रोहे ः प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात व राज्यात अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याबरोबरीनेच सामाजिक संस्था, संघटनाही कोरोनाशी लढा देण्यासाठी पुढे येत आहेत. गीतेचे सार जगाला सांगणारे प. पु. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्यायी परिवाराच्या वतीने रोह्यात  अत्याधुनिक फॉगिंग मशिन देण्यात आले असून रोह्यात या मशिनच्या साह्याने फवारणी सुरू आहे. ज्या वेळी एखादी सामाजिक आपत्ती येते तेव्हा प. पु. पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) यांच्या प्रेरणेने व त्यांची कन्या धनश्री आठवले-तळवळकर (दीदी) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाध्याय परिवाराने सामाजिक आपत्तीतून समाजाला बाहेर काढण्यासाठी भरीव कार्य केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वाध्याय परिवाराने कोरोनाविरोधात लढण्यासाठी उपाययोजनांसाठी सहभाग घेतला आहे. हमरस्ते, मार्केट्स आणि वस्त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी स्वाध्याय परिवारातर्फे दूरवर व शक्तिशाली पद्धतीने औषध फवारणी करू शकेल असे अत्याधुनिक फॉगिंग मशिन राज्याच्या आरोग्य विभागाला प्रदान केले होते. राज्याचे आरोग्यमंत्री  राजेश टोपे यांनी त्याबद्दल स्वाध्याय परिवाराचे विशेष कौतुकसुद्धा केले आहे. अशाच प्रकारचे एक मशिन धनश्री आठवले-तळवळकर यांनी रोहा शहरासाठी रोहे अष्टमी नगर परिषदेकडे पाठवले आहे. 29 एप्रिल रोजी पांडुरंगशास्त्री यांच्या निवासस्थानापासून श्रीफळ वाढवून रोह्यातील रस्त्यारस्त्यांवर औषध फवारणी करून संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात झाली आहे.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply