Breaking News

विधान परिषद निवडणूक होणार बिनविरोध

मुंबई : विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. अखेर काँग्रेस एकच जागा लढवण्यास राजी झाल्याने महाविकास आघाडी पाच जागांवर निवडणूक लढवणार असून, यामुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. संख्याबळ नसतानाही दोन जागा लढवण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता. कोरोनाच्या संकटकाळात निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अन्य पक्ष प्रयत्नशील असताना काँग्रेसने परस्पर दोन उमेदवार जाहीर केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले होते. अखेर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर काँग्रेसने एका जागेवरून माघार घेतली. त्यामुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे.

Check Also

निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …

Leave a Reply