Breaking News

भाजपच्या सुनील माळींकडून पोलीस प्रशासनाला मदत

रसायनी : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोनसावळा रोडवर सावळा गावासमोर नाकाबंदी करण्यात आली. या वेळी पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी सावळा गावचे रहिवासी सुनील माळी पुढे सरसावले. पावणे दोन महिन्यांपासून ते दिवसरात्र पोलिसांसोबत नाकाबंदीच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. गावातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यामार्फत ते पोलिसांना चहा, नाष्टा, पाणी देत असतात. सुनील माळी हे भाजप गुळसूंदे विभागीय अध्यक्ष असून त्यांनी सावळे गावचे तंटामुक्ती अध्यक्षपदही भूषविले आहे. गावातील भांडण तंटे सोडविण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. पोलिसांना ते नेहमीच सहकार्य करत असतात. त्यांच्या पावणे दोन महिन्यांच्या पोलिसांना करत असलेल्या मदतीबद्दल सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत. या पोलीस मित्राला रसायनी पोलीसही धन्यवाद देत आहेत.

Check Also

‌‘नेहले पे देहला‌’ @ ५० वर्षे; पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंजक

सुनील दत्तच्या वांद्य्रातील पाली हिलवरील अजंठा बंगल्यातील तळघरात असलेल्या मिनी थिएटरमध्ये एखादा चित्रपट अथवा गाणी …

Leave a Reply