नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएम केअर्स फंडाविरोधात संभ्रम पसरवल्याप्रकरणी कर्नाटकमधील एका वकिलाने सोनिया गांधी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. पीएम केअर्स फंडाबाबत काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून दिशाभूल करणारे ट्विट केल्याचा आरोप वकील के. व्ही. प्रवीण यांनी केला असून, कर्नाटकच्या शिवमोग्गामध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 153 आणि 505 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. देशात पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी असताना नवा पीएम केअर्स फंड स्थापन करण्याची गरज काय, असा संभ्रम पसरविण्यात आला होता.
Check Also
पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा
मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …
RamPrahar – The Panvel Daily Paper