Breaking News

कोरोनाग्रस्तांचे अधिवास विषाणूबाधित क्षेत्र घोषित

अलिबाग ः जिमाका

रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील मौजे जोगवाडी-तळा येथे एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने, तसेच म्हसळा तालुक्यातील मौजे खारसई येथे एक व्यक्ती, तर अलिबाग तालुक्यातील मौजे माणकुळे येथे दोन व्यक्ती आणि माणगाव तालुक्यातील मौजे रुद्रवली येथे एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेला परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

 या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)च्या कलम 188अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply