Breaking News

नगरसेवक निधीतून ओपन जिम; रामजी बेरा यांचा पुढाकार

खारघर : प्रतिनिधी

सध्याच्या घडीला आरोग्याचा प्रश्न महत्वाचा बनला आहे. व्यस्त कार्यकाळात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. याकरिताच भाजप नगरसेवक रामजी बेरा यांच्या पुढाकाराने सेक्टर 6 मधील प्लेग्राऊंडवर ओपन जिम सुरु करण्यात आले आहे.

बेरा यांनी त्यांच्या नगरसेवक निधीतून ओपन जिमची साधने याठिकाणी बसविली आहेत. याच मैदानावर ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड देखील उभारण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व्यस्त कार्यकाळात स्वतःच्या आरोग्यावर लक्ष द्यावे याकरिताच ही ओपन जिम सुरु करण्यात आले असल्याची माहिती नगरसेवक रामजी बेरा यांनी दिली. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून ही ओपन जिम सेक्टर 6 मध्ये सुरु करण्यात आली आहे.

Check Also

अष्टपैलू गायिका आशा भोसले

आशा भोसले… सुरुवात कुठून करावी असा या व्यक्तिमत्वाची खोलवर ओळख करून देताना मला प्रश्न पडतोय …

Leave a Reply