Breaking News

नवी मुंबईत पंधरा टन प्लास्टिक जप्त

नवी मुंबई : बातमीदार

स्वच्छ, सुंदर नवी मुंबईसाठी मनपाने जोरदार प्रयत्न सुरु केले असून, मनपा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मनपा हद्दीतील दोन कंपन्यावर धाडी टाकून सुमारे 15 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले.

स्वच्छतेसोबतच पर्यावरणशील दृष्टीकोन नजरेसमोर ठेऊन प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करण्याकडेही नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष दिले जात असून प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करावा याविषयी जनजागृती केली जात असून प्लास्टिक, थर्माकोल प्रतिबंधात्मक मोहिमा राबविल्या जात आहेत.

याचाच एक भाग म्हणून प्लास्टिक पिशव्यांचा साठा असल्याची माहिती मिळाल्यावरुन सेक्टर 20 बेलापूर येथील एका इमारतीत 10 टनाहून अधिक सापडलेल्या प्लास्टिक, थर्माकोल साठ्यावर जप्तीची धडक कारवाई करण्यात आली असून या कारवाईमध्ये  सापडलेल्या चलनामध्ये नामोल्लेख असणार्‍या पावणे एमआयडीसी येथील प्लॉट नं. 339 वरील गाळा क्र. 9 मध्ये असलेल्या गामी इंडस्ट्रीयल इस्टेट येथे छापा टाकून धडक कारवाई करून पाच टनापेक्षा अधिक नॉन ओव्हन पॉलीप्रॉपिलीन बॅग व त्यासाठीचा कच्चा माल जप्त केला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी इंद्रजीत देशमुख यांचा या कारवाईत महत्वाचा सहभाग होता.

नवी मुंबई महानगरपालिकेने बेलापूर येथे 10 टनाहून अधिक प्लास्टिक व थर्माकोल साठ्याची जप्ती तसेच पावणे एमआयडीसीमध्ये नॉन ओव्हन पॉलीप्रॉपिलीन बॅग निर्मिती ठिकाणी घातलेली धाड व यामध्ये पाच टनाहून अधिक जप्त केलेले साहित्य अशाप्रकारे एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर केलेले ही राज्यातील सर्वात मोठी प्लास्टिक, थर्माकोल प्रतिबंधात्मक कारवाई आहे.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply