Breaking News

रसायनीत चार नव्या रुग्णांची भर

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनीत कोरोनाचे नव्याने चार रुग्ण आढळले आहेत. रिस, भटवाडी, कांबे, रिसवाडी येथे प्रत्येकी एक असे नव्याने चार कोरोना रुग्ण सापडल्याची माहिती मंडळ अधिकारी नितिन परदेशी यांनी दिली आहे. तर आपटा आरोग्य केंद्रहद्दीत आपटा ते दापिवली भागात सध्या कोरोनाचा रुग्ण नसल्याची माहिती डॉ. प्रियंका चव्हाण यांनी बोलताना दिली.

भटवाडी येथील अंबरनाथमध्ये नोकरीसाठी जाणार्‍या तरुणाचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. तर रिस गावातील एकाचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. रिसवाडी गावातील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजते. तर कांबे येथील अपोलो लॉजिस्टिकमध्ये काम करणार्‍या तरुणाला कोरोना झाला असून वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत नव्याने सध्या चार रुग्ण आढळले आहेत. तर कामोठ्याहून रसायनीत एचआयएल कंपनीत कामानिमित्त येणार्‍या कामगारालाही कोरोना झाल्याने कंपनीने खबरदारी घेत परीसर निर्जंतुकीकरण केला. तसेच कैरे येथील बिग कोला कंपनीतील कोरोना रुग्णही उपचारानंतर बरा झाला आहे. नागरिकांनी सोशल डिस्टींगशनचे पालन करुन आपल्या स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन होत आहे.

Check Also

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य मूट कोर्टचे बुधवारी उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक …

Leave a Reply