पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 4) कोरोनाच्या 261 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 135, पनवेल ग्रामीणमधील 46, पेण तालुक्यातील 23, खालापूर तालुक्यातील 17, उरण तालुक्यातील 13, रोहा व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी आठ, माणगाव तालुक्यातील चार, कर्जत तालुक्यातील तीन, मुरूड तालुक्यातील दोन आणि सुधागड व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मृत व्यक्ती पनवेल व रोहा तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि पेण तालुक्यातील एक आहे. दुसरीकडे दिवसभरात 136 रुग्ण बरे झाले. दरम्यान, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजारांच्या वर जाऊन 5073 झाला असून, मृतांची संख्या 149 झाली आहे.
Check Also
रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष
रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper