Breaking News

भाजपकडून चिपळे गावात श्रमदान

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील चिपळे गावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्य केले आहे. यामध्ये गावातील गणेश घाटाची साफसफाई व दुरुस्ती तसेच गावदेवी मंदिर चिलाई येथील रस्त्याचे काम श्रमदान म्हणून केले.

या वेळी श्रमदान करण्यासाठी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच धनंजय पाटील, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा पनवेल तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, नारायण पाटील, सुभाष पाटील, समीर पाटील, रोहित पाटील, विजय पाटील, रवी पाटील, अक्षय पाटील, मयुरेश पाटील, प्रतिक पाटील, प्रनील फडके, सौरभ पाटील, किरण पाटील, सागर म्हात्रे, प्रसाद पाटील, विघ्नेश पाटील, अजित म्हात्रे, मयुरेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक

विविध विषयांवर विचारविनिमय पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक …

Leave a Reply