पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 299 नव्या रुग्णांची मंगळवारी (दि. 21) नोंद झाली असून, नऊ जण मृत्युमुखी पडले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 156 (महापालिका हद्दीतील 112 व ग्रामीणमधील 44), अलिबाग 44, खालापूर 38, पेण 18, उरण व रोहा प्रत्येकी 16, कर्जत चार, महाड तीन, मुरूड दोन आणि तळा व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल व उरण तालुक्यातील प्रत्येकी तीन आणि खालापूर, अलिबाग व रोहा तालुक्यातील एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 406 रुग्ण बरे झाले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 11095वर पोहोचला असून, मृतांची संख्या 293 इतकी झाली आहे. आतापर्यंत 7293 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने 3558 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Check Also
दिल चाहता है @२५ वर्षे; कायमच तारुण्यात राहिलेला चित्रपट…
एखादी मुव्हीज कायमच तारुण्यात राहण्याची कारणे काय असतात? आजची जेन झी आणि जेन अल्फा पिढी …
RamPrahar – The Panvel Daily Paper