Breaking News

उमटे धरणातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह

अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून 60 ते 70 गावांना पाणी पुरवठा केला जातो. बुधवारी पाण्याच्या टाकीत मृतदेह असल्याचे कर्मचार्‍यांच्या लक्षात आले. यामुळे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ऐन कोरोना संकटाच्या काळात ही घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ऐन पावसाळ्यात या परिसरातील गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काशीनाथ हंबीर (वय 40) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. 3 ते 4 दिवसापूर्वी तो व्यक्ती टाकीत पडला असल्याची माहिती आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply