Breaking News

पनवेल महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना महापालिकेमार्फत धान्य-जेवणाचे पाकीट पुरवा

सभागृह नेते परेश ठाकूर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना महापालिकेमार्फत धान्य-जेवणाचे पाकिट पुरविण्यात यावेत, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी लेखी निवेदन दिले.
या वेळी भाजपचे शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत उपस्थित होते.
सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशभर सर्वत्र कोरोना (कोविड-19) या विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असून, या विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये याकरिता केंद्र व राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सातत्याने स्वच्छतेचे आवाहन केले जात असून, सध्या कोरोना विषाणूच्या फैलावावर नियंत्रण आणण्यसाठी संपूर्ण देशभरात वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे. 3 मेपर्यंतच्या लॉकडाऊन काळात हातावर पोट घेऊन जगणार्‍यांसाठी व कुटुंबापासून दूर राहणार्‍या वर्गासाठी हा अत्यंत खडतर असा काळ आहे. कामधंदा बंद असल्याने तसेच हॉटेल व खानावळ बंद असल्याने त्यांनी कसे जगावे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची 40हून अधिक असल्याने महापालिका क्षेत्रातील दिव्यांग अन्नावाचून वंचित राहून नये व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची उपासमारीची वेळ येऊ नये, याकरिता महापालिकेमार्फत त्यांना धान्य-जेवणाचे पाकिट पुरविण्यात येणे गरजेचे आहे. या विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवाकरिता महापालिकेमार्फत धान्य, जेवणाचे पाकिट पुरविण्यात यावेत, अशी आग्रही मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply