Breaking News

सुधागडात बिबट्याचा वावर

पाच्छापूर येथे वासरावर हल्ला

पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील पाच्छापूर येथे एका बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) पहाटे 2:30च्या सुमारास घडली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पाच्छापूर येथील सुरेश गोविंद वरघडे यांना पहाटे त्यांच्या गुरांच्या गोठ्यात बिबट्या आला असल्याची चाहूल लागली. वरघडे यांनी ताबडतोब आरडाओरड केल्याने बिबट्या तेथून पळून गेला, मात्र त्याने वासरावर हल्ला करून त्याला जखमी केले.
सुधागड तालुक्यातील अनेक गावे व आदिवासी वाड्यांना जंगलाने वेढा दिला असल्याने भक्ष्याच्या शोधात बिबटे लोकवस्तीच्या आसपास वावरताना आढळतात. वनविभागाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply