खालापूर ः प्रतिनिधीपावसाच्या संततधारेमुळे पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीजवळ आली आहे, तर खालापूर तालुक्यातील डोणवत धरण ओव्हरफ्लो झाल्याने भिलवले, आडोशी अशी तिन्ही धरणे 100 टक्के भरल्याची माहिती कनिष्ठ अभियंता चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील खालापुरातील भिलवले धरण 5 जुलैला, तर कलोते मोकाशी येथील धरण 24 जुलैला व गुरुवारी डोणवत धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धामणी येथील वळण बंधारा पूर्वीच भरल्याने खालापूर तालुक्यातील तिन्ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे पुढील काळात भेडसावणारी पाणी समस्या सुटली आहे.
Check Also
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात
आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केले रक्तदान पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राचे अष्टपैलू, कार्यकुशल, विकासाभिमुख आणि लोकप्रिय …
RamPrahar – The Panvel Daily Paper