कामोठे : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून कामोठे येथील नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, भाजपा कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, गोपीनाथ भगत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, महिला अध्यक्ष वनिता पाटील यांच्या वतीने कामोठ्यातील सेक्टर 5 मधील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानात निंब, अशोक, गुलमोहोर, पेंटाफार्म, रेन ट्री यासारख्या विविध 46 वृक्षांचे वृक्षारोपण
करण्यात आले.
आपल्या सहकार्यांना आणि कार्यकर्त्यांना 5 ऑगस्ट रोजी माझा जन्मदिन या जन्मदिनी आपण आवर्जून प्रत्यक्ष भेटून अथवा सामाजिक कार्याचे आयोजन करुन शुभेच्छा देत असतात कोरोना संक्रमणाच्या काळात एकत्र येण्यावर बंधने आली आहेत. अनेक सहकार्यांच्या परिवारात कोरोनाच्या आघातामुळे दुःखाची छाया आहे. अशा स्थितीत वाढदिवस साजरा करणे योग्य नाही. अशा परिस्थितीत जाहिराती अथवा बॅनर्स पेक्षा सामाजिक कार्य करून आपल्या शुभेच्छा द्या मला त्या नक्की पोहोचतील, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कामोठे भाजपा मंडळातील सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या प्रांगणात हे वृक्षारोपण केले. न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन स्वामी म्हात्रे, माजी चेअरमन बालाराम चिपळेकर आदींच्या उपस्थित हे वृक्षारोपण करण्यात आले.
पनवेल : वार्ताहर
पनवेल – दिवा रेल्वेमार्गावर बांधण्यात आलेला खांदा वसाहत-नवीन पनवेल उड्डाणपुलावरील दुभाजकावर यापूर्वी लावण्यात आलेली बहुतांशी झाडे जळून गेले होते. याठिकाणी हिरवाई निर्माण व्हावी म्हणून भाजप नगरसेविका सीता पाटील यांनी येथे झाडांची पुनर्लागवड केली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा पर्यावरणपूरक उपक्रम घेऊन झाडे लावा झाडे वाचवा हा संदेश नागरिकांना दिला.
पनवेल-दिवा लोहमार्गाच्या वरून बांधण्यात आलेल्या या पुलावर दुभाजक आहे. त्यावर कुंडया ठेवून सिडकोने वृक्षारोपणाचा दिखावा केला होता. त्यानंतर या झाडांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांना वेळेवर पाणी न दिल्याने बहुतांशी झाडे जळून गेले आहेत. त्यामुळे येथील कुंड्या झाडा विनाच धूळ खात पडून होत्या. ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर सीता पाटील याठिकाणी स्वखर्चाने झाडे आणून वृक्षारोपण केले. काही कुंड्यांमध्ये पुन्हा मृदा भरण करून त्यामध्ये शोभेची झाडे लावण्यात आली.
सिडकोकडे पाठपुरावा करत बसण्यापेक्षा तसेच त्यांना पत्र व्यवहार करून वेळ वाया न घालवता पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम हाती घेतल्याचे सीता पाटील म्हणाल्या.
कळंबोली : प्रतिनिधी
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कळंबोली मंडळ शहर अध्यक्ष रवीशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष संदिप भगत यांच्या माध्यमातून कळंबोली बौद्ध वाडा येथे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी कळंबोलीत मास्कचेही वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत त्यामुळे जगणे मुश्कील झाले आहे असा बिकट परिस्थितीत नागरिकांना दिलासा देताना संदिप भगत यांनी मास्कचे वाटप केले. या वेळी भाजप कळंबोली अनुसुचित सेल मोर्चा अध्यक्ष रविंद्र जाधव, सरचिटणीस राजू दळवी, खजिनदार दिपक दुधावडे, आदिवासी सेल मोर्चा अध्यक्ष राकेश नाईक, सुधिर भगत आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी संदिप भगत यांनी सांगितले की झाडे लावून उपयोग नाही तर ती जगविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.

RamPrahar – The Panvel Daily Paper