Breaking News

उरणमध्ये विद्युत डीपीला आग

उरण : बातमीदारउरण शहरातील आनंदनगर कॉर्नर येथील लिबर्टी पार्क (सोसायटी)जवळील महावितरण कंपनीच्या एका डीपीला मंगळवारी (दि. 26) सकाळी अचानक आग लागली. डीपीवर वाढलेली झाडेझुडपे व कचर्‍यामुळे ही लागल्याची प्राथमिक माहिती आहे. डीपीला आग लागल्याचे समजताच आजुबाजूच्या जागरूक नागरिकांनी महावितरण, अग्निशमन दल, उरण नगर परिषदेशी संपर्क साधला. त्यानुसार सिडको व ओएनजीसीचे अग्निशमन दल, उरण नगर परिषदेचे नगरसेवक राजेश ठाकूर घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच आग आटोक्यात आणली गेली. सुदैवाने या घटनेत कोणतेही हानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे उघड्या व दुर्लक्षित डीपींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply