Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा कोविड योद्धा गौरव

उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून सन्मानपत्र

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना विषाणू जागतिक महामारीत नागरिकांना सर्वतोपरी मदत करीत आधार देणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाला पनवेल उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने कोविड योद्धा सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने हा विशेष गौरव झाला.
कोरोना व्हायरस आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन परिस्थितीत गोरगरीब  नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक, दानशूर नेते, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सचिव परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या वतीने मोदी भोजन कम्युनिटी किचन अर्थात मोफत अन्नछत्र उपलब्ध करून देण्यात आले. त्यामार्फत हातावर पोट असलेल्या एक लाख 25 हजारांहून अधिक नागरिकांना भोजन देण्यात आले. त्याचबरोबर 90 हजारांहून जास्त नागरिकांना अन्नधान्य देऊन कोरोनाच्या संकटकाळात आधार देण्यात आला. याशिवाय एक लाखाहून अधिक नागरिकांना मास्क व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्‍या गोळ्या, सॅनिटायझर असे आवश्यक साहित्य देण्यात आले. कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने केलेले कार्य मोलाचे आणि प्रेरणादायी ठरले. त्यामुळे विविध संस्था-संघटनांकडून गौरव होत असताना पनवेल उपविभागीय कार्यालयानेही या मंडळाचा गौरव केला आहे.
संपूर्ण जग कोविड-19 या आजाराशी लढा देत आहे. आपल्या देशातसुद्धा या विषाणूचा प्रादुर्भाव होऊन लाखो लोक बाधित, तर हजारो मृत्युमुखी पडले आहेत. अशा वेळी प्रशासन आपल्या खात्यातील सर्व विभागांचा समन्वय साधून या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची भूमिका अतिशय महत्त्वाची व केंद्रस्थानी आहे. असे सन्मानपत्रात नमूद करून गौरविण्यात आले आहे.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply