Breaking News

भाजप सांस्कृतिक सेलच्या जिल्हा संयोजकपदी राहुल वैद्य

कडाव : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांस्कृतिक सेलच्या जिल्हा संयोजकपदी कर्जतमधील अभिनेता व लेखक राहुल वैद्य यांची नियुक्ती केली आहे. वैद्य यांनी नाटक व मालिकांमध्ये आपला ठसा उमटविलेला आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी राहुल वैद्य यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. या वेळी किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहेरे, राजेश भगत, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष परशुराम म्हसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

ज्येष्ठ उद्योजक कान्हाशेठ ठाकूर यांचे निधन

पनवेल : रामप्रहर वृत्तज्येष्ठ उद्योजक कान्हाशेठ ठाकूर यांचे बुधवारी (दि.३) वयाच्या ७२व्या वर्षी अल्पशा आजाराने …

Leave a Reply