पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 17) एकाच दिवसात तब्बल 26 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, 185 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 338 रुग्ण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील सात, माणगाव सहा, कर्जत पाच, खालापूर चार, रोहा तीन आणि उरण तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल तालुक्यात 92, रोहा 29, खालापूर 15, कर्जत व पेण प्रत्येकी 12, अलिबाग सहा, मुरूड, सुधागड व श्रीवर्धन प्रत्येकी पाच आणि उरण व माणगाव प्रत्येकी दोन असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 21,571 आणि मृतांची संख्या 646 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 17,528 जणांनी कोरोनावर मात केल्याने 3397 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper