Breaking News

‘अंजुमन’च्या प्राचार्यपदी इश्तियाक घलटे

मुरूड ः प्रतिनिधी

मुरूडमधील अंजुमन इस्लाम जंजिरा आयटीआय तांत्रिक शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यपदी इश्तियाक घलटे यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन उत्कर्ष साधण्यासाठी अंजुमन संस्थेचा मोठा वाटा असून रायगडात संस्थेचा नावलौकिक आहे.

इश्तियाक घलटे 1992मध्ये निर्देशक पदावर रुजू झाले. 2013मध्ये त्यांना संस्थेकडून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल सहजीवन विद्या मंडळाचे चेअरमन फैरोज घलटे यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी माजी संचालक जमीर उलडे, इकबाल चोगले, इम्रान घलटे, बशीर लोगडे, मुबीन घलटे, रमीज घलटे, अकिब घलटे, रईस घलटे, इम्तियाज घलटे, इरफ ान घलटे आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply