पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 448 नव्या कोरोना रुग्णांची आणि सात रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद शुक्रवारी (दि. 21) झाली. त्याचबरोबर 401 जण दिवसभरात बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 232, अलिबाग 58, पेण 32, खालापूर 29, महाड 20, रोहा 19, कर्जत 16, माणगाव 14, उरण व सुधागड प्रत्येकी नऊ, श्रीवर्धन पाच, मुरूड व पोलादपूर प्रत्येकी दोन आणि म्हसळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मृत रुग्ण अलिबाग तालुक्यात दोन आणि पनवेल, कर्जत, मुरूड, माणगाव व श्रीवर्धन प्रत्येकी एक आहे.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 23,335 व मृतांची संख्या 689 झाली आहे. जिल्ह्यात 19,126 जण कोरोनामुक्त झाल्याने 3520 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंच्या वाटपाचा उपक्रम
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक कामोठे ः रामप्रहर वृत्तनेत्याची खरी ताकद ही त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये असते. …
RamPrahar – The Panvel Daily Paper