पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 23) 298 नव्या कोरोना रुग्णांंची नोंद झाली, तर 10 रुग्णांंचा मृत्यू झाला. त्याचबरोबर 381 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 173, अलिबाग 35, महाड 27, रोहा 14, उरण 11, पेण 10, माणगाव नऊ, कर्जत चार, पोलादपूर दोन, तर सुधागड, श्रीवर्धन व म्हसळा येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मृत रुग्ण पनवेल व पेण प्रत्येकी तीन, महाड दोन, तर खालापूर व सुधागड येथे प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांंमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 24,229 व मृतांची संख्या 708 झाली आहे. जिल्ह्यात 20,164 जण कोरोनामुक्त झाल्याने 3358 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper